Maratha High School, Nashik

About School

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्म.रावसाहेब थोरात, कर्म.काकासाहेब वाघ,कर्म.भाऊसाहेब हिरे,कर्म.अण्णासाहेब मुरकुटे,कर्म.गणपत दादा मोरे,कर्म. डी .आर.भोसले,कर्म.ॲड बाबुराव ठाकरे,कर्म.विठ्ठलराव हांडे,कर्म.वसंतराव पवार हितचिंतक व देणगीदार यांच्या योगदानातून ही संस्था उभी राहिली आहे.त्यांच्या प्रेरणेनेच बहुजन समाजाला ज्ञानाची दालने खुली झाली आहेत.त्यापैकीच हे एक दालन म्हणजे मराठा हायस्कुल, ०६ ऑगस्ट १९३६ साली मराठा हायस्कुलची स्थापना झाली.संस्थेची माध्यमिक स्तरावरील ही पहिली ज्ञानशाखा होय.आजमितीला शहरातील व संस्थेतील उत्तम निकालाची परंपरा,उपक्रमशीलता, शिस्त या गुणवैशिष्ट्यांनी  स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित केलेली  ही शाळा होय . विद्यालयाला लाभलेले राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री न.ब.थोरात, श्री एस.टी.आहिरराव,श्री.एन.के.पवार,श्री एन.आर.भोसले  व ह्या विद्यालयाची शिस्त,ज्ञान देण्याची पध्दत यामुळे अनेक ज्ञानवंत, प्रतिभावंत पुढे आले व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत .माजी  खासदार व सरचिटणीस साहेब कर्म.डॉ.वसंतराव पवार,माजी खासदार व संस्थेचे मा.अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे,संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.तुषारदादा शेवाळे , मा.सभापती  ॲड. नितीनभाऊ ठाकरे,मा.आमदार वसंतराव गीते हे सर्व या विद्यालयाचेच विद्यार्थी होत.  शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.उपक्रमशील शाळा म्हणून मराठा हायस्कुलचा नावलौकिक आहे. त्यामुळेच विद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,त्यांनी साहित्य,कला,क्रीडा,अभिनय इत्यादी क्षेत्रात नावलौकिक मिळवावा.कथाकथन,वकृत्व,चित्रकला इत्यादी मध्ये स्वत:चा आगळावेगळा ठसा निर्माण करावा.स्पर्धा परीक्षा,शालांत परीक्षांमध्ये चांगले यश मिळवावे म्हणून शाळेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात. एन.टी.एस.,एन.एम.एम.एस.,नवोदय,शिष्यवृत्ती,ऑलिंपियाड,होमिभाभा,यासारख्या शाळाबाह्य परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्याकडून तयारी करून घेतली जाते. क्रीडाक्षेत्रात देखील मराठा हायस्कूलने आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे.

Main Building

विद्यालयात हॉकी,हॅन्डबॉल,टेनिक्वाईट,तलवारबाजी,बेसबॉल,योगा,बुध्दिबळ,फुटबॉल,थ्रोबॉल,स्विमिंग,स्केटिंग,रोलबॉल,व्हॉलीबॉल,कबड्डी,खो-खो इत्यादी  व इतर खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. ८४ व्या वर्षात पदार्पण करत असताना आजमितीला सुमारे ४००० पेक्षा अधिक विद्यार्थी इयत्ता ५ वी ते १० वी च्या एकूण ५९ तुकड्यांमधून शिक्षण घेत आहे.विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची संख्या ११५ इतकी असून विद्यालय वाचनालय,प्रयोगशाळा,संगणक कक्ष,कलादालन,खेळाचे मैदान व पुरेशा वर्गखोल्या यांनी परिपूर्ण आहे.                                                  महाराष्ट्रातील पहिले ISOमानांकन प्राप्त विद्यालय अशी ख्याती मिरवणारी आमची शाळा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वागीण विकास व्हावा,समाजातील गरजू आणि बुद्धिमान मुले शिक्षणापासून वंचित राहू नये,तसेच त्यांच्या अभिरुचीच्या क्षेत्रात त्यांना ज्ञानाचे उपयोजन करता यावे यासाठी कटिबद्ध आहे. संस्थेचे सेवक संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गुलाबराव भामरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत करतय.ते स्वत: व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. नाशिक मनपा क्षेत्रात माध्यमिक स्तरावर एक मानबिंदू ठरलेली ही ज्ञानशाखा उत्तरोत्तर प्रगतीच्या व यशवैभवाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.</p>

                                                                                                                 श्री गुलाबराव भामरे

                                                                                                                     मुख्याध्यापक,मराठा हायस्कुल ,नाशिक

सेवक संचालक मविप्र समाज संस्था,नाशिक